प्राचीन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा – हस्तलिखिते

१३।१।१७ ,रोजी मुंबई विद्यापीठातील  संस्कृत भवनात आयॊजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बङोदा येथील रहिवासी आणि संस्कृत हस्तलिखितांचे गाढे अभ्यासक डॉ.सिध्दार्थ वाकणकर यांना आमंत्रित केले होते.प्राचीन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या हस्तलिखितांवर प्रदीर्घ चर्चा व्हावी,हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.हस्तलिखितांच्या माध्यमातून मानवाचा सर्वांगीण विकास कसा घडवता येईल,आणि हस्तलिखिते हा एकमेव मार्ग म्हणता येईल,हे पटवून सांगणारे असे हे व्याख्यान म्हणता येईल. सरांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात इतक्या रंजक पध्दतीने केली की  श्रोत्यांमध्ये
उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.सर्वांच्याच जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे त्यांचे बालपण. आजी-आजोबांकडून ऐकलेली परीची गोष्ट (सिंड्रेला) आणि अगदी आनंदाने खेळला जाणारा खेळ म्हणजे सापशिडी (मोक्षपट) यांचा थेट संबध हस्तलिखितांशी असू शकतो,असा विचारही नसलेल्या आमच्या माहितीत भर टाकणारी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली  होती. आपल्याला माहित नसलेल्या ज्ञानात भर पडावी आणि मानवाची प्रगती व्हावी, यासाठी हस्तलिखितांचा अभ्यास करणे महत्वाचे झाले आहे.डॉ.वाकणकर सरांनी स्व:ताचे  अनुभव, हस्तलिखिंतांचा अभ्यास कसा करायचा?, हल्लीच्या युगातील हस्तलिखितांची दयनीय अवस्था, त्यामागची कारणे आणि त्यावरील उपाययोजना अशा अनेकविध विषयांवर भाष्य केले.सर्वत्र पसरलेले  हस्तलिखितांचे पुरावे,कागदपत्रे असूनही त्यावर कार्य करण्यास अपुरी ईच्छाशक्ती (मानवी बळ),अशी ही विरोधात्मक परिस्थिती पाहणे हे दुर्भाग्यच होय, असेच मत त्यांच्या संपूर्ण व्याख्यानातून जाणवत होते. परंतु एकंदर व्याख्यानातून आणि डॉक्टर वाकणकर सरांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे हस्तलिखितांसारख्या क्षेत्रांसाठी समर्पित केलेली भावना सर्वांनाच सकारात्मक उर्जा देणारी ठरली,हे आवर्जुन सांगावसे वाटते.
-आरती चौधरी (एम.ए-2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP