मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग , ऋतायन आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या संस्कृत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने, संस्कृत दिना निमित्त दरवर्षी आंतरशालेय संस्कृत कथाकथन स्पर्धा घेतल्या जातात.
यंदा ह्या स्पर्धेत एकूण ३०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला व अतिशय उत्साहाने ही स्पर्धा पार पडली..
पनवेल ते बदलापूरपर्यंतच्या शाळा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तसेच काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व विशेष म्हणजे पालकांनीही स्पर्धेत भाग घेतला होता.


