





मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार वाचन प्रेरणा दिन दिनांक __ ०४ जानेवारी २०२५ रोजी आमच्या संस्कृत विभागात अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील ८० विद्यार्थी आणि पदविका अभ्यासक्रमातील ५० विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या प्रतिज्ञेच्या संस्कृत आवृत्तीचे सामूहिक पठण करून करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित झाले.
यानंतर, विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन संस्कृत भाषेच्या अध्ययनास चालना मिळेल, असा विभागाचा विश्वास आहे.
विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुस्तक परीक्षण व अभिवाचन स्पर्धेत संस्कृत विभागातील मीनल पावस्कर आणि मनीषा सोनिग्रा या विद्यार्थिनींनी भाग घेतला आणि उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थिनींची नावे प्रथम तीन क्रमांकांमध्ये राहिली.
दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहण समारंभानंतर सिविक्स अँड पॉलिटिक्स विभागाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात या विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
संस्कृत विभागाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास आणि संस्कृत भाषेच्या अध्ययनास चालना देण्यास निश्चितच प्रभावी ठरला आहे.
-अपूर्वा काळे