Dr. Rajivkumar Sinha gives lecture

Dr. Rajivakumar Sinha (Former Dean, Sampurananda Sanskrit University) gave a lecture on the concept of speech in grammar and poetry in the Department of Sanskrit University of Mumbai on 29th March, 2019.

दिनांक २९ मार्च २०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे “संपूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालयाचे” निवृत्त Dean असलेल्या महोदय राजीव सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राजीव सिन्हा ह्यांनी प्रथम Health science ह्या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर Political science (राज्यशास्त्र) ह्या विषयात सुद्धा ते पदवीधर झाले. संस्कृत ची खूप आवड असल्याने, दोन पदवींचे मानकरी असताना देखील, संस्कृत भाषेवर ही त्यांनी आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. ‘Philosophy of Religion’ हे त्यांचे मूळचे कार्यक्षेत्र आहे. शिवाय ते न्यायशास्त्र आणि काव्यशास्त्रात सुद्धा पारंगत आहेत. मुंबई विद्यापीठात त्यांचे जे व्याख्यान झाले, ते ‘वाक् तत्त्व’ ह्या विषयावर आधारित होते. कुठले ही शास्त्र किंवा साहित्य असो, त्याचे मूळ हे भाषाच असते, हे सत्य असल्याने सिन्हा यांनी मुळात भाषा म्हणजे काय, वाणीच्या चार पायऱ्या जसे की– परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी हे उदाहरणासहित स्पष्ट केले. संस्कृत भाषा किती वैविध्य पूर्ण आहे हे ही त्यांनी सांगितले. मम्मटकृत काव्यप्रकाश हा काव्यशास्त्रावरील महान ग्रंथ आहे. त्यातल्या काव्य आणि काव्यशास्त्राशी निगडीत विविध संकल्पना त्यांनी अतिशय सोप्पी उदाहरणे देत छान समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांना अगदी त्यांच्या वयाचे होऊन चित्रपटांमधील उदाहरणे देत काव्यशास्त्राची अवघ्या तासा–दीड तासात एक छान सफर घडवली. साहित्य हे केवळ शब्दांवर अवलंबून नसते तर ते अर्थाचे शास्त्र आहे हे त्यांनी सांगितले. अगदी घरा- घरातील उदाहरणे देताना त्यांनी ‘Cooking is a literature and not just an activity’ हे ही स्पष्ट केले. परब्रह्म हे रसरुप आहे, आणि त्यामुळे त्याचा अंश असणारी प्रत्येक कलाकृती शेवटी आनंदातच परावर्तित होते, ह्या वाक्याने त्यांनी व्याख्यानाची सांगता केली. -मोहिनी कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP