काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा तितकाच देखणा प्रयोग व्हावा अशा तर्हेने या नाटकावरील आज डॉ.गौरी माहुलिकरांचे व्याख्यान रंगले. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख हे पद भुषवलेल्या माहुलिकर मॅडमच्या व्याख्यानाला अनेक मंडळी मुद्दाम आली होती. सर्वसाधारणपणे नाटकाचा रसास्वाद वर्ग आणि त्यातील …
Category : Reports
33 posts
महाकवि शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकावर आज प्रा.शकुंतला गावडे यांचे व्याख्यान होते. शकुंतला मॅडमनी शूद्रकाच्या व्यक्तीमत्वाचा, त्याच्या कालाचा आढावा घेऊन मग कथानक सांगितले आणि संपूर्ण नाटकाचा अलंकारशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आढावा घेतला. त्यात शृंगार, करुण, हास्य या सारखे रस, नाटकाला कलाटणी देणार्या घटनांमधुन दर्शवली जाणारी प्रकरणवक्रता, शूद्रकाची मानवी स्वभावाची जाण, त्याने आपल्या पात्रांचे केलेले विस्मयचकित करणारे मनोविश्लेषण अशा …
आज मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागप्रमुख प्रा.डॉ. माधवी नरसाळे यांचे भट्टनारायणाच्या “वेणीसंहार” नाटकावरील व्याख्यान रंगले. स्टार प्लसवरील “महाभारत” मालिकेसाठी सल्लागार म्हणुन मार्गदर्शन केलेल्या माधवी मॅडमनी व्याख्यानात तदानुषंगाने देखिल काही विचार मांडले. कलावंत काहीएक स्वातंत्र्य घेऊन मुळ कथेत भर घालत कलाकृती निर्माण करतो त्यावेळी काही पात्रांना काव्यगत न्याय देणे, त्याकाळची सामाजिक, धार्मिक परिस्थिती आणि स्वतः कलाकाराचा पिंड …