विश्व – संस्कृत दिन#श्रावण पौर्णिमा#नारळी पौर्णिमा#संस्कृत कथाकथन
दरवर्षी संस्कृत दिनानिमित्त आय. इं.एस्. संस्कृत केंद्र , मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग व ऋतायन संस्था यांच्या तर्फे आयोजित केली जाणारी संस्कृत कथाकथन स्पर्धा या वर्षी नारळी पौर्णिमेलाच म्हणजे संस्कृत दिनालाच साजरा करण्याचा योग आला आणि आजचा संस्कृत दिवस खासच झाला.
राखी पौर्णिमेचा सण असूनही इयत्ता पहिली ते दहावीच्या ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आणि आजच्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित राहिले.
इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री. सतीश नायक सर यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून संस्कृत भाषेचे महत्त्व मुलांना सांगितले.
शालेय संस्कृत नंतर पुढेही संस्कृतचे उपयोजन कुठे व कसे होऊ शकते या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी व प्रत्यक्ष पालकांशी संवाद साधण्यासाठी रुपारेल महाविद्यालयाच्या संस्कृत शिक्षिका श्रीमती पल्लवी पेडणेकर, तसेच रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. वैशाली दाबके मॅडम उपस्थित होत्या.
मुंबई विद्यापीठ संस्कृत विभागाच्या मुख्य, डॉ. शकुंतला गावडे मॅडम यांचीही विशेष उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभल्याने संस्कृत प्रेमी, स्पर्धक, स्पर्धेतील परीक्षक, यांचे छोटे संस्कृत संमेलनच झाले.
सर्व परीक्षकांचे मनापासून आभार व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा