Harshadev Madhav and Rishiraj Jani discuss about their Sanskrit compositions

Dr. Harshadev Madhav, Dr. Rishiraj Jani interacted with students of the Department of Sanskrit on 2nd March 2019. It was apt to listen their poetries on current issues of the society like GST , Selfie, OTP and also new forms experimented in Sanskrit like haiku, dialogue poetry etc

मुंबई विद्यापीठात संस्कृत कवींचे सादरीकरण‘लेखक आमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत संस्कृत विभागातर्फे कार्यक्रम- डॉ. सूचित्रा ताजणे

मुंबई : ‘लेखक आमच्या भेटीला’ अर्थात ‘लेखक: मिलति अस्मान्।’ या उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील संस्कृत विभागात दोन मार्च रोजी डॉ. हर्षदेव माधव व डॉ. ऋषिराज जानी या पिता-पुत्रांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या काव्यसादरीकरणाने त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
अभ्यासक्रमात ज्यांचे लेखन समाविष्ट आहे, अशा लेखक-कवींना या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पाचारण करण्यात येते. संस्कृत साहित्यातील प्रयोगशील कवी म्हणून डॉ. हर्षदेव माधव ख्यातकीर्त आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रकवितेचा परिचय करून दिला. तसेच हायकू, टंका इत्यादी नवनवीन प्रकारांतील त्यांच्या कविता, जीएसटी, सेल्फी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील विषयांवरील संस्कृत कवितांचे अभिवाचन त्यांनी केले
डॉ. ऋषिराज जानीदेखील पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून संस्कृतमध्ये प्रयोगशील रचना करतात. त्याचा परिचय त्यांनी आपल्या सुंदर शब्दांद्वारे करून दिला. गणिताच्या सूत्रांप्रमाणे, व्हॉट्सअॅप चॅटप्रमाणे कविता, अनेकविध चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना आदींचा त्यांच्या कवितेत समावेश होतो. ‘रक्तशाटिकाधारिणीमाता’ नामक त्यांच्या पुस्तकातील लघुकथांचा थोडक्यात परिचयही त्यांनी करून दिला. 
विद्यार्थ्यांना व शिक्षकांनादेखील नवा उत्साह देणाऱ्या या कवींच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधवी नरसाळे यांनी केले. विभागप्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी या दोन्ही कवींच्या ‘सूर्यगेहेतमिस्त्रा’ नामक काव्यसंग्रहातील संस्कृत कवितांचे स्वतः केलेले मराठी भावानुवाद त्यांच्यासमक्ष प्रस्तुत करून आभारप्रदर्शन केले.  

BOITuesday, March 05, 2019 | 03:31 PM

http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5235485435724084247


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP