सादर नमस्कार.

बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या आगामी अकराव्या अधिवेशनाचे आयोजन अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेकडून करण्यात येणार आहे हे आपणास विदित आहेच.

हे अधिवेशन अमरावती येथे गुरुवार दिनांक १० डिसेंबर ते शनिवार दिनांक १२ डिसेंबर २०१५ या काळात संपन्न होईल.  या अधिवेशनात “वेद आणि अवेस्ता”, “व्याकरण आणि भाषाशास्त्र”, “अभिजात साहित्य”, “धर्म आणि तत्त्वज्ञान”, “इतिहास आणि पुरातत्त्वविद्या”, “प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान” आणि “विदर्भ इतिहास आणि संस्कृती” या सात विषयविभागांमध्ये निबंधवाचन होईल.

11-Bulletin-1

कळावे

आपला नम्र

श्रीनन्द लक्ष्मण बापट

सहसचिव